Sakaal, Friday, February 11, 2011 AT 12:00 AM (IST)
मानवजातीच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासमध्ये मानवाने जेवढे बदल पाहिले नसतील, तेवढे बदल आपण गेल्या १०-१५ वर्षांत पाहिले. त्यातला सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे माहिती मुक्त होणे. त्याने जगण्यात आमूलाग्र बदल घडविला; आपले नातेसंबंध, व्यवहार, मनोरंजनाच्या कल्पना सारेच बदलले. १९९० च्या पूर्वार्धात इंटरनेट सार्वजनिक वापरासाठी खुले केले गेले. जगातील सर्वांना आपल्याकडे असलेली माहिती इतर सर्वांना उपलब्ध करून देता यावी व जगात माहिती व ज्ञानाचा मुक्त व्यवहार असावा, ही त्यामागची भावना होती. त्याच सुमारास भारत मुक्त आर्थिक व्यवस्था स्वीकारून या बदलांमध्ये सक्रिय सहभाग घेऊ लागला. या जाळ्याने माणसाच्या काही परंपरागत समजुतींना तडा दिला. या समजुती अशा होत्या : एक - ज्ञानासाठी तुम्हाला ग्रंथालये पालथी घालावी लागतात. दोन - ज्ञान हे सर्वांसाठी नाही- काही विशिष्ट समाजघटकांची ती मक्तेदारी आहे. तिसरे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञान मिळविण्यासाठी तुमच्याकडे काही किमान पात्रता असावी लागते. "इंटरनेट'ला जात, धर्म, लिंग, वर्ण, गरीब-श्रीमंत असले कोणतेही अडथळे माहीत नाहीत. इंटरनेटच्या या आभासी दुनियेला कोणत्याही लोकशाहीला लाजवेल, असा मोकळेपणा, स्वातंत्र्य व लोकतंत्राचा भक्कम पाया आहे. याच तत्त्वांशी निष्ठा बाळगत जिमी वेल्स याने "विकिपीडिया' या मुक्त (आणि मुफ्त) ज्ञानकोशाची सुरवात केली. संपूर्णपणे लोकसहभागावर आधारित असलेल्या या ज्ञानकोशाने गेल्याच महिन्यात १० वर्षे पूर्ण केली. "माणसाला असलेली सर्व माहिती तुमच्या हाताच्या बोटांवर' हे या ज्ञानकोशाचे ब्रीदवाक्य आहे. आज या कोशात २८१ भाषांतील २.३ कोटी लेख आहेत. केवळ इंग्रजी भाषेतल्या लेखांची संख्याच ३.५ कोटी आहे. हे सर्व लेख लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांच्या मदतीने लिहिलेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने "विकिपीडिया'वरील माहिती लोकशाहीवादी आहे. एखाद्या विषयावर जर लेखामध्ये बदल करायचा असेल, तर योग्य तोडगा निघेपर्यंत चर्चा केली जाते. अर्थात, तुम्ही लिहीत असलेल्या प्रत्येक माहितीला संदर्भ असणे अनिवार्य आहे. विकिपीडियाने नुकतेच गिकी (गव्हर्न्मेंट - विकी) नावाचा उपक्रम सुरू केला. आहे. याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, अंदाजपत्रके मुक्त चर्चेसाठी खुली करण्यात येत आहेत. शासनव्यवस्थेला पारदर्शी व उत्तरदायी बनवणे हा यामागचा उद्देश आहे. विकिपीडियाबरोबरच सध्या चर्चेत असलेला असाच माहितीचा साठा म्हणजे "विकिलिक्स' "विकी' हे नाव सोडल्यास या दोन्हींचा एकमेकांशी काही संबंध नाही. हो, माहिती ही अभिजनांची मक्तेदारी नाही हे त्या दोन्हींमधले एकमेव साम्य. जर तुम्हाला एखादी माहिती काही अंतस्थ हेतूंनी जनतेपासून लपवली जाते आहे, असं लक्षात आलं तर ती तुम्ही इथे आणून देऊ शकता. ती माहिती "विकिलिक्स'कडे कशी आली याचा थांगपत्ता कोणालाही लागू दिला जात नाही- खुद्द "विकिलिक्स'लाही नाही, याची खबरदारी घेतली गेली आहे. २००६ मध्ये जुलियन असान्जने याच पद्धतीने अनेक बलाढ्य राष्ट्रांची गुपिते विकिलिक्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणायला सुरवात केली. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या अमानुष हल्ल्याच्या चित्रफितीने अमेरिकेलाही मान खाली घालायला लावली. बलाढ्य राष्ट्रे "विकिलिक्स'ने माहितीचा गैरवापर केला व राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली, असे ठणकावत आहेत, तर असान्ज हा नव्या युगाचा रॉबिनहूडच बनलेला आहे. विकिलिक्स असो वा विकिपीडिया किंवा बहुचर्चित फेसबुक, या सर्वांना बांधणारा एक प्रबळ विचार आहे- तो म्हणजे "माहितीला मुक्त असू द्या.' माहिती शक्तिशाली आहे आणि जेव्हा ती जनतेच्या हातात असते तेव्हा तिची शक्ती कैक पटीने वाढते. इंटरनेटच्या माध्यमातून कधीही नव्हता इतका माहितीचा साठा आपल्याला खुला आहे. जनतेला जागरूक करण्याचे काम ही माध्यमे करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेस धोकादायक म्हणून माहिती दाबून ठेवायचा प्रयत्न केला तरी ती बाहेर येणारच. या माहितीच्या महासागराला जनतेपासून लपवून ठेवणे आता शक्य नाही. किंबहुना जर राष्ट्रांनी याचा योग्य वापर केला तर त्याचा परिणाम लोकशाही बळकट करण्यासाठीच होऊ शकतो. इंटरनेटची निर्मितीच मुळात माहितीची मुक्त देवाण-घेवाण होण्यासाठी झाली, माहितीला एका जागी जखडून ठेवण्यासाठी नाही. हे जाळे आता नवीन आहे. लांबच्या प्रवासातली फक्त काही पाऊले आहेत. पुढचा प्रवास कसा होतो, हे आपली ही वीण किती बळकट आहे, त्यावर अवलंबून आहे. एकूणच लोकशाहीचा आशय अधिक रुंद-प्रशस्त करण्यासाठी मुक्त माहिती पर्वाचा परिमाणकारक उपयोग केला पाहिजे. जागरूक नागरिकशक्तीची जबाबदारी यासंदर्भात मोठी आ
No comments:
Post a Comment