पाहा वाचा ऐका(२३ मार्च २०१२ रोजी लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रकाशित) |
इंटरनेटवर तासंतास सर्फिंंग करतो आपण. कितीतरी वेळ जातो फेसबुकवर. गुगलचॅटवर. आणि आता यू-ट्यूबवरही. पण समजा, हाच वेळ थोडासा सत्कारणी लावला आणि मस्त मजा करता करताच आपल्याल हाती काही भन्नाट आणि मौलिक गोष्टी लागल्या तर.? जगभरात काय काय चाललंय हे आपणच शोधून काढलं तर.? आपल्या आवडीच्या विषयाच्या लागलं हात धुवून मागे. आणि ते करता करता काही मस्त क्षण वाट्याला आले तर.? ते यावेत म्हणून हा नवाकोरा विशेष कॉलम पाहा-वाचा-ऐका. लावून घ्या ही सवय स्वत:ला आणि तुम्हालाही सापडेल एक जादूई गुहा.
विचार करा, गणितासारखा विषय जर तुम्हाला तुमच्या घरी, मित्र-मंडळींबरोबर मजा करत काही व्हिडीओ बघत बघत शिकता आला तर? काय मजा येईल ना ! बोअर गणित एकदम व्हिडिओ गेम खेळण्याइतपत भन्नाट होऊन जाऊ शकेल. पण असं होऊ शकतं.? का नाही.? तुम्ही सर्फिंंग करता करता ‘खान अँकॅडमी’ या संकेतस्थळावर जा.! यू-ट्यूबवर ‘गणित’ २00६ मध्ये सलमान खान नावाच्या एका व्यावसायिकाने आपल्या भाच्चे कंपनीला गणिताच्या काही संकल्पना समजावाण्यासाठी एक व्हिडीओ तयार केला आणि तो यू-ट्यूबवर टाकला. आश्चर्य म्हणजे तो व्हिडीओ अनेक जणांनी पहिला आणि त्याला फारच चांगला प्रतिसादही आला. अशा व्हिडीओंचा इतरांना का उपयोग होऊ नये, असा प्रश्न त्याला पडला आणि इथूनच ‘खान अँकॅडेमी’ची संकल्पना पुढे आली. खान अँकॅडेमी हे एक शैक्षणिक साहित्य पुरविणारे संकेतस्थळ आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संकेतस्थळावरील साहित्य सर्वांंसाठी अगदी विनामूल्य उपलब्ध आहे. इथे गणितापासून जीवशास्त्रापर्यंंत आणि भूगोलापासून इतिहासापर्यंंत सर्व विषयांवर ७ ते १४ मिनिटांचे छोटे-छोटे असे ३000 च्या वर व्हिडीओ आहेत. काहीतरी नवीन बघायचं असेल तरी इथला ‘फ्रान्समधील चित्रकार’असा व्हिडीओ बघू शकता. एखादी संकल्पना जर आपल्याला चित्ररूपात समजावली तर आपल्याला ती अधिक काळ लक्षात राहते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच आज अमेरिकेमधल्या अनेक शाळांमध्ये हे व्हिडीओ रोजच्या अभ्यासक्रमात घेतले आहेत. त्यामुळे या साईटवर जा.आणि रंजक शिक्षणाचा एक भन्नाट अनुभव घ्या.! www.khanacademy.org - प्रज्ञा शिदोरे
ग्रीनअर्थ मधे कार्यरत
|
Thursday, March 29, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment