उज्ज्वल परंपरा असलेल्या पुण्याचा खासदार भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगात...!!!!!!!!
एक पुणेकर म्हणून तुम्हाला लोकसभेतला तुमचा प्रतिनिधी भ्रष्ट असलेला चालेल?मी एक अभिमानी पुणेकर आहे. लोकसभेतला माझा प्रतिनिधी भ्रष्ट असू शकत नाही. म्हणून सुरेश कलमाडींनी ताबडतोब आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. कलमाडी निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यास पुणेकर पुन्हा निवडून देतील....
भ्रष्ट खासदार नको असे वाटत असल्यास रविवारी, १ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता शनिवार वाड्यासमोर मी उभी राहणार आहे. तुम्ही सुद्धा या.
तुमची उपस्थितीच तुमचा विरोध नोंदवेल..