माझ्या घरासमोरचा रस्त्यावर (प्रतिज्ञा मंगल कार्यालय ते अलंकार पोलीस चौकी) गेल्या वर्षभरात दुसऱ्यांदा काम सुरु आहे. हा रस्ता वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येतो.
तो रस्ता अतिशय सुंदर असल्याने मोठ्ठाली माशीनस् आणून खरवडण्यात आला
(चेष्टा करत नाही! खरंच खूप सलग, एकसारखा, गुळगुळीत असल्याने वाहने जोरात जायची, या वेगाने अपघात होऊ नये म्हणून तो खराब करण्यात आला)
काल पासून परत त्याच रस्त्यावर डांबरीकरण सुरु आहे. खरवडलेलं पुन्हा भरण्यासाठी.
आणि त्या रोड रोलर्सच्या चाकांखाली करदात्यांचा पैसाही त्या खाडीसोबतच भरडला जातो आहे!